शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

आय चिंतन संमेलनाच्या माध्यमातून
नवे शोध सामान्यांपर्यंत पोहोचवा
                                            -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती दि. 7 : नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात घडून आलेले नवे बदल आणि नवनवीन संशोधन सर्वांपर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने विदर्भ ऑप्थलमिक सोसायटीने केलेले परिषदेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे. आय चिंतनाच्या या तीन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात झालेले नवे शोध व शस्त्रक्रीयेविषयी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.
हॉटेल ग्रॅन्ड महफील येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. टी. लहाने, डॉ. अनिल धामोरीकर, डॉ. ललीत वर्मा, डॉ. वरुन नायर, डॉ. प्रकाश मराठेडॉ. सेनीन अग्रवाल, डॉ. सेनील सगने, डॉ. अनिल हरवानी, डॉ. बिपीन सगने, डॉ. शैनक मोकादम, डॉ. राजेश जवादे, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. अतुल कढाणे, डॉ. प्रशांत बावनकुळे आदी उपस्थित होते.
यावेळी विदर्भ संघटनेच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तीन दिवस (6, 7 8 ऑक्टोंबर) चालणाऱ्या या परिषदेमध्ये नेत्र शस्त्रक्रीया क्षेत्रात झालेले नवीन संशोधन या विषयावर तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान व लाईव्ह शस्त्रक्रीयेसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका आपल्या भाषणातून विषद केली. डॉ. नायर यांनी नेत्र चिकित्सेच्या क्षेत्रात घडून आलेल्या नवनवीन सर्जरीविषयी या संमलेनात माहिती मिळणार असल्याचे सांगितले. या परिषदेत देशातील 20 राष्ट्रीय आणि 72 लोकल पातळीवरील फॅकल्टीज नेत्र चिकीत्सेवर आपले संशोधन मांडणार असून संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी मोठी उपलब्धी असणार आहे, असे डॉ. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ. अनिल लद्दड, डॉ. बी. आर. देशमुख, डॉ. विरल शहा, डॉ. कौस्तुभ भट्टाचार्य, डॉ. मनिपाल जॉर्ज, डॉ. सुजाता गुहा, डॉ. सौरभ लुथरा, डॉ. संतोष अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. निता व्यवहारे व डॉ. अनुराधा तोटे यांनी तर डॉ. अतुल कढाने यांनी आभार मानले.

000000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा