मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
-पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
* भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी 2
कोटीचा निधी प्राप्त
अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या 2 कोटींच्या
निधीतून करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी
स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल, अशी
माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची
पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार, बौध्द
धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री. आकोडे, तायडे, शहारे, पालकमंत्र्यांचे
विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, स्वीय सहायक राजेश बोबडे,
नगरसेवक दिनेश बुब, आर्कीटेक्चर श्री. खंडारकर, कंत्राटदार श्री. अग्रवाल
आदी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिली.
तेथील परिसराची, बांधकामाची पाहणी त्यांनी
केली. सदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के
काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली.
भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. भिमटेकडी
येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी
संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावी. हा परिसर रमनिय व सुंदर
होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीत. विद्यार्थ्यांना या
स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केली. परिसरातील
जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे
आदेश त्यांनी यावेळी दिले. भिमटेकडी आणि शिवटेकडीच्या
सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार
करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या.
शहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी
केली होती. त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी
भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व
शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता 2 कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे.
सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त
निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल. या
दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून 4 कोटी
57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.
******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा