विभागातील पाचही जिल्ह्यात आज ‘रन फॉर
युनिटी’
*सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 30 : सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा,
वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात ‘रन फॉर युनिटी’ आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांनी
मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
वाशिम
: राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी
'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. गुरूवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात
वाजता ही दौड सुरु होणार असून यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होणार
असून नविन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य
रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर या दौडचा समारोप होईल.
यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सात वाजेपर्यत वाशिम जिल्हा क्रीडा संकुल
येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच एकता दौडमध्ये वाशिम शहर आणि जिल्ह्यातील युवक-युवती, खेळाडू, नागरिकांनी मोठ्या
संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोला
: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडमध्ये
अकोला शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे
करण्यात आले आहे. यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल, वसंत देसाई स्टेडियम येथून
सकाळी आठ वाजता सुरु होईल. यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सात वाजेपर्यंत
वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाने केले आहे.
बुलडाणा
: राष्ट्रीय एकात्मतेसाठी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे.
या एकता दौडमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाने केले आहे. यावर्षी ही दौड जिल्हा पोलिस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील
मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलिस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. ही दौड
दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरु होईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी
सकाळी सातवाजेपर्यत
जिल्हा पोलिस मैदान येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अमरावती
: ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडमध्ये अमरावती शहर आणि जिल्ह्यातील
युवक-युवती, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने
केले आहे. यावर्षी ही दौड विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी आठ वाजता सुरु
होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सातवाजेपर्यंत विभागीय क्रीडा
संकुल येथे
उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
यवतमाळ
: येथील पोस्टल ग्राउंड (समता मैदान) येथून एकता दौड सुरू होईल. सकाळी
साडेसात वाजता शहरातील एलआयसी चौक, बस स्टँड चौक, मुख्य बाजारपेठ मार्गाने जाणाऱ्या
या दौड मध्ये प्रशासकीय अधिकारी, खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी सहभागी
होणार आहेत, असे क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांनी
मोठ्या संख्येने या दौड मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा