सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी
यांना अभिवादन
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिली शपथ
अमरावती,
दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या
पुण्यतिथीनिमित्त पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख यांनी आयुक्त कार्यालयात
त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्री. देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
यावेळी सहायक आयुक्त विवेकानंद काळकर तसेच अन्य
अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिन हा देशभर
राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा