दहावी व
बारावीच्या विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारी ते
23 मार्च
पर्यंत समुपदेशनाची सुविधा
अमरावती, दि. 18 : शैक्षणिक वर्ष
2020 मध्ये परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय
मंडळ स्तरावर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना
परिक्षेसंबंधी असलेल्या समस्यांचे मार्गदर्शन या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्यात
येणार आहे. दि. 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 या कालावधीत सकाळी आठ ते सायंकाळी
आठ वाजेपर्यंत विद्यार्थी आपल्या समस्यांचे निराकरण समुपदेशकांना प्रश्न विचारुन करु
शकतील. समुपदेशकांची नांवे व भ्रमणध्वनी
क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
अमरावती जिल्हृयासाठी सी.एस. कोहळे 9423649541, डी.एस.
चौधरी 9421785605, अकोला जिल्ह्यासाठी एच.आर. हिंगणकर 9371641764, एन.आर. गोंडचर
9922063636, यवतमाळ जिल्ह्यासाठी ए.जी. ठमके 9423625414, पी.बी. सुरोशे
9420895934, बुलडाणा जिल्ह्यासाठी व्ही. डी. भारसाकळे 9422926325, एस.एस. लालवाणी
8275232316 तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक 0721-2662608, असे विभागीय सचिव अनिल पारधी, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी हे पत्रक
प्रसिध्दी दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा