शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे
सौरउर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे
आयोजन
अमरावती, दि. 4 : ग्रामीण अल्प शिक्षीत युवक व युवतींना
स्वयंरोजगारातून स्वावलंबी होता यावे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विकास
मंत्रालय, व केंद्रिय प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु
पॉलीटेक्निक योजना शासकीय तंत्रनिकेतन,अमरावती येथे राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत
स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रिक कौशल्य व सौर उर्जेवर आधारित 15 दिवस कालावधीचे
नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन संस्थेत करण्यात येत आहे.
प्रशिक्षणात नाव
नोंदविण्यासाठीचे अर्ज कार्यालयामध्ये उपलब्ध असून या प्रशिक्षणात सहभागी
होण्यासाठी वयाची अट नाही. मुलाखत पद्धतीने प्रशिक्षणार्थ्याची निवड करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे
वसतीगृहासमोर, शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा,
असे संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा. एस. जे.
गायकवाड यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा