राष्ट्रीय नमुना पाहणीला सुरुवात
नागरिकांनी आवश्यक सर्व
माहिती द्यावी
अमरावती, दि. 06 : केंद्रशासनाच्या
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics &
Programme Implementation) अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (National
Statistical Office) द्वारे दरवर्षी संपूर्ण देशात राष्ट्रीय नमुना पाहणीच्या
विविध विषयावर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्याचे काम करते. या अनुषंगाने जाने-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत राष्ट्रीय नमुना
पाहणीच्या 78 व्या फेरीमध्ये "देशांतर्गत पर्यटनावरील खर्च" व ''बहुविध निर्देशांक पाहणी' या
विषयावर विस्तृत माहिती गोळा केली जाणार असून महाराष्ट्रामध्ये राज्य नमुन्याचे
काम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या अर्थ व सांख्यिकी
संचालनालयामार्फत केली जाणार आहे. 78 व्या फेरीमार्फत गोळा करण्यात येणाऱ्या
माहितीचा उपयोग हा पर्यटनाचे देशाच्या आर्थिक स्थितीमधील महत्व, पर्यटनाशी निगडीत
विविध क्षेत्रामधील रोजगार निर्मिती, मागास वर्गीयांचा विकास या सारख्या विविध
विषयाकरिता, तसेच United Nation ने ठरवून दिलेल्या शाश्वत विकास ध्येय 2030
च्या अनुषंगाने देशस्तरावरील काही महत्वाची निर्देशांक काढण्यासाठी याचा वापर
करण्यात येणार आहे.
अमरावती विभागातील सर्व नागरिकांनी, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन
विभागांतर्गत येणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामधील अधिकारी/कर्मचारी यांना
माहिती गोळा करण्यास सहकार्य करुन आवश्यक व योग्य माहिती द्यावी, असे आवाहन
सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, अमरावती यांनी केले
आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा