22 मार्च जलदिनानिमित्य
जलदिंडीचे आयोजन
अमरावती, दि.16 : पाण्याचा सुयोग्य वापर, पाण्याची बचत व पाणी
संवर्धनाच्यादृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 22 मार्च रोजी
सकाळी साडेसात वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले
आहे. 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह असून विविध कार्यक्रमाअंतर्गत
जलदिंडी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने आयोजीत
जलदिंडी जलसाक्षरतेचा संदेश देत मालटेकडी, पोलीस पेट्रोल पंप, पंचवटी चौकातून
मार्गक्रमण करीत अभियंता भवन येथे विसर्जीत करण्यात येईल. नागरिकांनी जलदिंडीमध्ये
सहभागी व्हावे असे आवाहन अधीक्षक अभियंता श्री. चारथळ यांनी केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा