विभागस्तरावर
कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन
Ø अपर
आयुक्त मंगेश मोहिते नियंत्रण अधिकारी
अमरावती, दि. २७ : कोरोनाबाबतच्या तक्रारी, सूचना, उपाययोजना
आदींबाबत विभागस्तरावर कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अपर आयुक्त
मंगेश मोहिते या कक्षाचे नियंत्रण अधिकारी आहेत.
विभागस्तरावर स्थापन करण्यात आलेला कोरोना नियंत्रण कक्ष चोविस
तास सुरू राहणार आहे. या कक्षाचे नियंत्रण अधिकारी श्री. मोहिते कक्षास प्राप्त
माहिती, तक्रारी, सूचना, उपाययोजनाबाबतची माहिती संबंधित कार्यालय आणि शासनास
कळवतील.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा