गुरुवार, ५ मार्च, २०२०

उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता


 उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

अमरावती, दि. 5 : शुक्रवार  6 मार्च रोजी विदर्भात मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाच्यावतीने वर्तविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतातील पक्व झालेली पिके जसे रब्बी ज्वारी, हरभरा, गहू इत्यादी पिकांची काढणी करुन घ्यावी, काढणी झालेल्या पिकाची मळणी करुन सुधारीत पिकाची साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास, काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने योग्यरित्या झाकून ठेवावीत. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधवीत, असे आवाहन सुभाष नागरे, विभागीय कृषी सहंसचालक, अमरावती विभाग अमरावती यांनी केले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा