अज्ञात
वाहनाच्या धडकेने बिबटचा मृत्यू
अमरावती, दि.19 : मेळघाट व्याघ्र
प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा अंतर्गत 1 मार्चं रोजी वन्यजीव परिक्षेत्रातील हतरु ते
रायपूर रोडवर रस्त्याच्या बाजुला बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार प्राथमिक
वनगुन्हा जारी करण्यात आला. अशी माहिती प्राप्त झाली आहे. मृत पावलेला बिबट हा
सुदृढ, नर प्रजातीचा असून त्यांचे अंदाजे
वय 3 वर्षे होते. या बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले असून अज्ञात वाहनाच्या धडकेने
अंतस्त्राव व छातीच्या बरगड्या तुटल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे, असा अंदाज
व्यक्त करण्यात आला आहे. शवविच्छेदन करुन मृत बिबट्याचे नमुने पुढील तपासणीसाठी
न्यायवैधक प्रयोगशाळा, अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना सेमाडोह ते हतरु
भाग-1 येथे नविन केलेल्या सिमेंट क्रॉकीट रोडवर झालेली असून यापूर्वी या रस्त्यावर
अश्या घटनेची नोंद झालेली नाही. या बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षीत असून (नखे,
मिशा,पंजे इ.) शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. या
प्रकरणाचा पुढील तपास कमलेश पाटील सहाय्यक
वनसंरक्षक हे करित असल्याचे डॉ. सिवाबाला एस. उपवनसंरक्षक, वन्यजीव मेळघाट व्याघ्र
प्रकल्प सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा