सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

किटकनाशकाची शिफारशीनुसार व काळजीपूर्वक फवारणी करावी

 

कृषी सहसंचालकाचे शेतकऱ्यांना आवाहन

किटकनाशकाची शिफारशीनुसार व

काळजीपूर्वक फवारणी करावी

अमरावती, दि. 10 : सध्या खरीपाचा हंगाम सुरु असून पीक फवारणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशी व इतर पीकांवर किटकनाशकाची फवारणी करतात. शेतकऱ्यांनी शिफारशीत असलेली किटकनाशकाची फवारणी करणे, योग्य मात्रा वापरणे तसेच फवारणी करतांना काळजी घ्यावी असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.

पिकांवर फवारणी करतांना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी

किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक किटकनाशके विक्रेताकडूनच खरेदी करावी. तसेच खरेदी पूर्वी किटकनाशकांच्या पॅकींगवरील लेबल, बॅच नंबर, उत्पादन तारीख, अंतीम तारीख व सिल तपासून घ्यावे. किटकनाशंकाची साठवणूक त्यांचे मूळचे पॅकींग/वेष्टणात ठेवावीत. तसेच साठवतांना त्यांचा वातावरणाशी सरळ संबध येणार तसेच लहान मुलांशी संबध येणार  नाही याची काळजी घ्यावी. द्रावण तयार करतांना तसेच फवारणी करतांना संरक्षक कपडे उदा. ॲप्रान, गॉगल, मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड, गमबुट, इत्यादी वापरावेत. किटकनाशके आपले शरीराच्या कोणत्याही भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले नाक, डोळे, कान व हात उडणाऱ्या औषधांपासून संरक्षीत राहतील याची संपूर्ण काळजी घ्यावी. वापरा विषयक सूचनांचे अवलोकन केल्याशिवाय मिश्रण तयार करु नये. फवारणी करतांना शिफारशीत नसलेल्या किटकनाशके/पिक वाढ संजिवके (PGR) यांचे मिश्रण करु नये. फवारणी करतांना शरीरास अपायकारक ठरतील असे कामे करु नयेत. खाणे पिणे, धुम्रपान करणे, तंबाखु खाने, फवारणीच्या कालावधीमध्ये अजिबात करु नये. एकाच व्यक्तीकडून सतत किटकनाशकाची सतत फवारणी करणे टाळावे. तसेच फवारणी झाल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी व कपडे बदलावे, फवारणी करीता वापरलेले कपडे परत न धुता वापरु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त व विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले आहे.

****

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा