चराईत जमा झालेल्या गुरांची
12 ऑगस्ट रोजी विक्री
अमरावती,
दि. 10 : मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभागाच्या अधिनस्त जारिदा परिक्षेत्रातील
अवैध चराईमध्ये सरकार जमा करण्यात आलेल्या 31 गुरांची 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता
द्विलिफाफा पध्दतीने विक्री करण्यात येणार आहे. या विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी
बोली धारकास पाच हजार रुपयांची रक्कम निविदा फॉर्म भरतेवेळी धनाकर्ष/रोखीने सादर करावी
लागेल. बोलीधारकांनी त्यांचे अर्ज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालयात सादर
करावे असे उपवनसंरक्षक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा