गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’प्रकल्प 251 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’प्रकल्प

251 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

 

अमरावती, दि. 6: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकिय, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी आदिवासी विकास विभाग, आकार बहुउद्देशिय ग्रामणि विकास संस्था, नागपूर आणि आकार ग्रुप हिंगणा यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘मिशन आकार’प्रकल्पाचा 251 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्याकरिता NEET,III-JEE,MH-CET या प्रेवश परिक्षांच्या 10 दिवसांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. या ऑनलाईन वर्गामध्ये धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमनुरी, औरंगाबाद व अकोला येथील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

          या रिव्हिजन वर्गामध्ये डॉ. आशिष दर्यापूरकर आय.आय.टी.मुंबई, डॉ. सचिन बोंगावार, एम.एससी (रसायनशास्त्र), डॉ. विरेंद्र सांगोडे एम.एससी, श्रीमती मिनाक्षी एम. टेक, श्री. धनराज लांजे (रसायनशास्त्र), श्रीमती सुषमा गौतम एम.एससी (गणित) या तज्ञ प्राध्यपकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा