शासनाच्या
लोककल्याणकारी योजनांचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा
- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
17 मे पर्यंत कर्तव्यपूर्ती यात्रेचे आयोजन
अमरावती दि.11: शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन
प्रश्न त्वरित निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या
दृष्टीने कर्तव्यपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी
योजनांचा सर्वसामान्यांना सहज लाभ मिळावा हा या मागील हेतू आहे. शासनाच्या योजनांचा
गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ
कडू यांनी आज केले. अचलपूर तालुक्यातील कुष्ठा(बु) येथे
दत्तप्रभू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कर्तव्य पूर्ती यात्रेच्या उद्घाटन
प्रसंगी श्री कडू बोलत होते.
यावेळी आमदार राजकुमार पटेल, कुष्ठा(बु)च्या
सरपंच अमृताताई उमक, उपसरपंच वृषाली शेलोकर, कुष्ठा(खु) च्या सरपंच सुनीता पवार, अचलपूर
तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार शंकर श्रीराव, पुरवठा निरीक्षक देशमुख, श्रीमती वडूरकर,
गटविकास अधिकारी खेडकर, सहायक गटविकास अधिकारी कासदेकर आदी उपस्थित होते.
कर्तव्य पूर्ती यात्रेतील विविध स्टॉलची
राज्यमंत्र्यांकडून पाहणी
कर्तव्यपूर्ती यात्रेतील जिल्हा परिषद,
पंचायत समिती, परिवहन, आरोग्य विभाग, समाज कल्याण, पुरवठा विभाग, महिला व बालकल्याण
विभाग, सहकार, भूमी अभिलेख आदी विभागांकडून लावण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी श्री कडू
यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी
यावेळी दिले.
राज्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना
राशन कार्डचे वाटप
मीरा कासदेकर, मोनाली भगत, सुनंदा लहाने,
संगीता थोपट, शेख इस्माईल, नेहा मदगे, कुसुम पाटील, संगीता थोरात, नजमा बानो सलीम आदी
लाभार्थ्यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते राशन कार्डचे वाटप करण्यात आले.
11 ते 17 मे पर्यंत कर्तव्य पूर्ती
यात्रेचे आयोजन
अचलपूर तालुक्यातील आज (11 रोजी) सुरू
झालेली कर्तव्यपूर्ती यात्रा येत्या 17 मे पर्यंत विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार
आहे. आज कुष्ठा(खु)च्या कर्तव्य पूर्ती योजनेचा पोही, हरम, आरेगाव, भिलोना, कोपरा,
वडनेर, भुजंग, कुष्ठा (खु), टवलार, खांजमानगर येथील नागरिक लाभ घेऊ शकतील.
12 मे रोजी कांडला, 13 मे रोजी पथ्रोट,
14 मे रोजी गौरखेडा (कुंभी) व 17 मे रोजी धामणगाव गढी येथे या राहुटीचे आयोजन करण्यात
आले आहे.
0000000