प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा
- पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर
पालकमंत्र्यांच्या हस्ते
विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
अमरावती, दि. 28 : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात यावे. प्राथमिक
आरोग्य केंद्र हे ग्रामीण जीवनाच्या कणा आहे. यामुळे या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध
व सर्व सोयींनी युक्त असावे. तसेच पुढील काळात येथील पाणंद रस्ताचे काम लवकरच पूर्ण
करणार,असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती
ठाकूर यांनी आज दिले.
जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ ढोमणे, सरपंच मंगला लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. दिलीप रणमले, तहसिलदार सागर ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल, रमेश
काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे निर्लेखन करुन नवीन इमारत
बांधकामचे भूमीपूजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कामाची अंदाजे किंमत
साडेचार कोटी रुपये एवढी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व विस्तारीकरणांतर्गत हे विकास
काम करण्यात येणार आहे. अडगाव बु. येथील आयुवेर्दिक
दवाखान्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत
62.95 लक्ष एवढी आहे. उपकेंद्राची बांधकामे व विस्तारीकरण या अंतर्गत हे विकास काम
करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे श्रीमती
ठाकूर यावेळी म्हणाल्या.
अडगाव येथील सरगम महिला प्रभाग संघाच्या वार्षिक
सर्वसाधारण सभेला श्रीमती ठाकूर उपस्थित होत्या .
राजमाता
महिला स्वाधारगृहाच्या बांधकामचे भूमिपूजन
शिवरत्न
जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेमार्फत रेवसा येथे राजमाता महिला स्वाधार गृहाचे
बांधकामचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वाधारगृहाची जागा ही
लोकवगर्णीतून तयार झाली आहे. महिलांना घराबाहेर तसेच घरातही कित्तेकदा संकटांना सामोरे
जावे लागते. बरेचदा या अडचणीतून बाहेर निघणे प्रसंगी कठीण होते. अशावेळी स्वाधारगृहामुळे
महिलांना माहेरपणाच्या आधार गवसेल. राजमाता महिला स्वाधारगृहाचे काम अत्यंत महत्त्वाचे
असून यामुळे अनेक माता-बहिणीसाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी
यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांची विशेष उपस्थिती
होती. विलास इंगोले, प्रभारी तहसिलदार सुनिल रासेकर, संस्थेचे अध्यक्ष विवेक राऊत,
रेवसाच्या सरपंच वर्षा चव्हाण, पोलिस पाटील छाया वानखडे, राखी रीठे तसेच ग्रामस्थ यावेळी
उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा