अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज
10 जुन पर्यंत सादर करावे
अमरावती, दि. 31 (विमाका) : अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना परदेशात पदवी/पदव्युत्तर
अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे, यासाठी प्रवेश घेतलेल्या दहा विद्यार्थ्यांकडुन शिष्यवृत्तीचा
लाभ घेण्यासाठी 10 जुन पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत
येत असलेल्या एकलव्य रेसिडेंशियल स्कुल व शासकीय आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय
तसेच इतर शाळा/महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रवेश,
अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या अर्जात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता
परदेशात शिक्षण व शिष्यवृत्ती योजनेबाबतचा उल्लेख करण्यात यावा.
विद्यार्थ्यांसाठी विहीत नमुन्यातील
अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयात उपलब्ध
आहेत. दिनांक 10 जून 2022 पर्यत विहित नमुन्यातील सत्र 2022-23 चे परिपुर्ण अर्ज प्रकल्प
अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला,
पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे सादर करावे, असे सुरेश वानखडे, अपर आयुक्त, आदिवासी
विकास अमरावती यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा