दहावी
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी
‘कौशल्य
सेतू’ चा लाभ घ्यावा
अमरावती, दि. 8 : ‘कौशल्य सेतू’ मधील
व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक
शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष
2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या माध्यमिक शाळांच्या पात्र
विद्यार्थ्यांनी मार्च 2019 च्या इ. 10 वी प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ
क्रेडिटसचा लाभ देणेसाठी आवश्यक कार्यवाही करावी.
इ. 10 वी प्रमाणपत्र
परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इ. 10
वी च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या माध्यमिक शाळेमार्फत विहित केलेल्या नमून्यात
अर्ज करुन नोंदणी करावी. विहित नमूना मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या
लाभार्थी विद्यार्थ्यांनी दिनांक 6 मे
2019 ते 15 मे, 2019 या कालावधीत अर्ज सादर करावा. या अर्जासोबत माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र (इ. 10 वी) सर्व परीक्षाचे गुणपत्रक व पी. एम. के. व्ही. वाय (कौशल्य
सेतू अभियान) प्रमाणपत्र इ. च्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. हा अर्ज
विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबत प्रक्रिया शुल्क रु. 40 व गुणपत्रिका शुल्क
रु. 10 असे एकूण रु. 50 शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डी. डी.)/रोखीने
विभागीय मंडळात जमा करावेत.
या प्रमाणे शाळांनी हे अर्ज
दि. 6 ते 16 मे 2019 या कालावधीत संबंधित
विभागीय मंडळात जमा करावेत. ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस घेऊन विद्यार्थी माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) उत्तीर्ण झाल्यास पुन्हा मंडळाच्या परीक्षेला
नियमित अथवा पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ होऊ शकणार नाही.
शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी
कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासन
निर्णयातील तरतूदींचा लाभ घेण्यासाठी विहित कार्यपध्दतीनुसार अर्ज करावेत असे, डॉ.
अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा