शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका
प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्र
अमरावती, दि. 30 : शासकीय
तंत्रनिकेतन अमरावती या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेत दि. 21
मे 2019 रोजी 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी
प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सुमदेशन व मार्गदर्शन केंद्राचे
उद्घाटन अमरावती विभागाचे तंत्रशिक्षण सहाय्यक संचालक डॉ. एम.ए.अली यांचे उपस्थितीत
संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेतील
सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या समुपदेशन व मार्गदर्शन
केद्राचे समन्वयक म्हणून प्रा. हेंमत जोशी व प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया प्रभारी अधिकारी
म्हणून प्रा.सी.एन.निकोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय तसेच खाजगी तंत्रनिकेतनांमार्फत विविध अभियांत्रिकी
विद्या शाखामधील पदविका अभ्यासक्रम राबवण्यात येतात. या पदविका अभ्यासक्रमांचा उद्देश
विविध क्षेत्रातील उद्योगांसाठी कुशल तंत्रज्ञ व मनुष्यबळाची निमिर्ती करणे व पर्यायाने
तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा असतो. शासनाने मागिल काही वर्षापासून
उद्योगांची कुशल तत्रज्ञ व मनुष्यबळाची मागणी पुर्ण करण्यासाठी अनेक खाजगी विनाअनुदानित
तंत्रनिकेतनांना परवानगी दिली. शासकीय तंत्रनिकेतनांमधील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या
दुष्टीने अनेक तंत्रनिकेताना शैक्षणिक स्वायत्तता प्रदान केली तसेच सर्व शासकीय तंत्रनिकेतनांमधील
अधिव्याख्यता विभाग प्रमुख व प्राचार्य यांची रिक्त पदे भरण्यात आली. शासकीय तंत्रनिकेतनांमधील
इमारती यंत्रसामुग्री व इतर भौतिक सुविधांबाबतच्या
त्रुटीचीही पुर्तता करण्यात आली आहे.
परंतू मागील काही वर्षापासून विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी
पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कमी कल दिसून येतो. महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण
संचालनालय व इतर संबंधित प्राधिकरणांनी विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम
प्रवेश घेण्याकडे कमी कल असण्याचा व त्यामुळे तंत्रनिकेतनातील इमारती, यंत्रसामुग्री
व इतर भौतिक सुविधा व उच्चविद्याविभुषित अध्यापक वर्ग यांच्या क्षमतांचा पुरेशा वापर
होत नसल्याच्या कारणांचा आढावा घेतला असता विद्यार्थ्याचा अनावस्थेतमागे इतर अनेक कारणांसोबतच
ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्याना विविध अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पुर्ण केल्यांनतर उद्योग क्षेत्रात
तसेच स्वयंउद्योगांसाठी उपलब्ध संधीबाबत योग्य समुपदेशन व मार्गदर्शनाचा अभाव हेही
कारण प्रामुख्याने निदर्शनास आले.
त्यामुळे शासनाने 2019-20 या वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या
संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी
प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिये बाबत विविध स्तरावर समुदेशन व मार्गदर्शनाचे
कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत विविध शाळांमध्येसुध्दा
प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन
करण्यात येईल.
सदर योजनेअंतर्गतच शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे समुदेशन
व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे विद्यार्थ्याना विविध
अभियांत्रिकी पदविका अभ्यास पूर्ण केल्यांनतर उद्योग क्षेत्रात तसेच स्वयंउद्योगांसाठी
उपलब्ध संधीबाबत तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांद्वारे योग्य
समुदेशन व मार्गदर्शन करण्यात येईल तरी सर्व इच्छूक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ
घ्यावा, असे आवाहन संस्थेच प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा