अमरावती विभागात एक लाखावर मजूर रोहयोच्या कामावर
Ø लॉकडाऊनच्या काळात रोहयोचा आधार
Ø अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मजूर
Ø यवतमाळात 735 ग्रामपंचायतीत कामे
अमरावती, दि.
22 : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरी भागासह ग्रामीण भागातील
नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला. मजूरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू केली. यात प्रामुख्याने
वैयक्तिक लाभाच्या योजनांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करण्यात येत आहेत. आज अमरावती
विभागातील पाचही जिल्ह्यात एक लाखाच्यावर मजूर कामावर आले आहेत.
अमरावती विभागातील चार हजार 25 ग्रामपंचायतीपैकी
दोन हजार 404 ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामावर तब्बल
एक लाख सात हजार 641 मजूर कामावर आली आहेत. मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी
रोहयोमधील वैयक्तिक लाभाच्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने
सार्वजनिक आणि खासगी विहिरी, घरकुल, वृक्षसंगोपन ही कामे हाती घेण्यात आली आहे.
सध्यास्थितीत
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मजूर कामावर आले आहेत. जिल्ह्यात 851 ग्रामपंचायतीपैकी
709 ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू करण्यात आली आहे. या कामावर विभागात सर्वाधिक
71 हजार 869 मजूर कामावर आली आहेत. यात 14 हजार 290 मजूर आधार प्रमाणीकरण झालेले नाहीत.
यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार 218 ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक 735 ग्रामपंचायतीमध्ये कामे
सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी 16 हजार 517 मजूर कामावर आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील
900 ग्रामपंचायतीपैकी 541 गावात सुरू असलेल्या कामावर 11 हजार 479 मजूर कामावर आहेत.
वाशिम जिल्ह्यातील 507 ग्रामपंचातीपैकी 237 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. याठिकाणी
तीन हजार 944 मजूर कामावर आहेत. अकोला जिल्ह्यातील 549 ग्रामपंचायतीपैकी 182 ग्रामपंचातीत
तीन हजार 832 मजूर कामावर आहेत.
लॉकडाऊनमुळे
शहरी भागातील खासगी आस्थापनांमधील रोजगार संपूष्टात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील
मजूर रोहयोच्या कामाकडे वळला आहे. तीन आठवड्यापूर्वी दि. 28 एप्रिल रोजी पाचही जिल्ह्यात
52 हजार 162 मजूर रोजयोच्या कामावर होते. आज दि. 22 मे रोजी ही संख्या दुप्पटीने वाढून
एक लाख सात हजाराच्या वर गेली आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने
तात्काळ दखल घेत रोहयोची कामे सुरू केल्याने ग्रामीण भागातील अकुशल मजूरांना रोजगाराचा
आधार मिळाला आहे.
रोहयोच्या
कामावर येणाऱ्या प्रत्येक मजुराला मास्क देण्यात येत आहे. तसेच साबून आणि सॅनिटायझरही
गरजेनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर मजूर एकत्र येणार नाही, याची
काळजी घेत कामाचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्कच्या
वापरासह हात स्वच्छ ठेवणे आणि परस्परांमध्ये अंतर ठेवण्याविषयी मजूरांना सुचना देण्यात
येत आहे. इतर ठिकाणचा रोजगार बंद झाल्यामुळे रोहयोच्या कामावर जास्त प्रमाणात मजूर
येत असल्याचे रोहयो उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी सांगितले.