सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन
आरोग्य योजनेचा लाभ
Ø जिल्हाधिकारी यांना दक्षता घेण्याच्या सूचना
अमरावती, दि. 27 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत
रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे, नागरिकांना या योजनेचा लाभ देताना
जिल्हाधिकारी यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त यांनी
दिले आहे.
राज्य शासनाने ज्योतिबा फुले जन आरोग्य ही योजना
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्नित करून एकत्रितरित्या 1 एप्रिल 2020 पासून
अंमलात आणली आहे. त्यामुळे या योजनेत सुमारे 90 टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून
समावेश झाला आहे. उर्वरीत नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, तसेच
सध्यास्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन
आरोग्य योजनेचे अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असल्याने
नागरिकांनाही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या 996 उपचार
पद्धती मान्यताप्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येतील.
शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या 134 उपचारापैकी
120 खासगी रुग्णालयांना 31 जुलै 2020 पर्यंत मान्यताप्राप्त दराने उपलब्ध करून
देण्यात आले आहे. तसेच काही किरकोळ, मोठे उपचार आणि तपासण्या ज्या महात्मा फुले जन
आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्या उपचार
आणि तपासण्या सदर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्राधिकरणाच्या
दरानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित
रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य सोसायटी, वरळी मुंबई यांच्यामार्फत
करता येईल.
कोरोनासाठी शासनाने जाहीर केलेल्या खासगी अंगीकृत
रुग्णालयाकडून संशयित रुग्णांवर उपचार करण्यात करण्यात येईल. त्यासाठी पीपीई कीट
आणि एन 95 मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात
प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा
शल्यचिकित्सक यांच्यामार्फत नियंत्रण केले जाईल. यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी
यांनी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा