शुक्रवार, ५ मार्च, २०२१

राज्य महिला आयोगाचे अमरावती विभागीय स्तरावरील कार्यालय स्थापन

 

राज्य महिला आयोगाचे

अमरावती विभागीय स्तरावरील कार्यालय स्थापन

                                                                    

 

महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय स्तरावर कार्यालय स्थापन करण्यात येत आहे. दि.8 मार्च रोजी जागतिक दिनाचे औचित्य साधून राज्य महिला आयोगाचे अमरावती विभागीय कार्यालय, दत्तात्रय सदन, दसरा मैदान मार्गावरील देशपांडेवाडी येथे सुरु करण्यात येत आहे.

अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या अमरावती विभागातील पाचही जिह्यांमध्ये महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने महिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ञ समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन कडुन सहकार्य घेण्यात येईल. अतिमहत्वाच्या गंभिर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे (Suo Moto) नोंद घ्यावयाच्या तक्रारी बाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित/नियोजीत सुनावण्या ह्या ऑनलाईन पदधतीने घेण्यात येतील. राज्य महिला आयोगाचे अमरावती विभागीय कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन कामकाजासाठी विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी समुपदेशक आणि लिपिक पदांवर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

अमरावती विभागातील विविध प्रकारच्या अत्याचाराने पिडित असलेल्या महिलांनी त्यांचे समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास, अमरावती विभाग, पहिला मजला ‘दत्तात्रय सदन’ दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती कार्यालयीन पत्यावर आणि दुरध्वनी क्र. (0721) 2566486 किंवा  dy.comnrwcdamtdivamt13@gmail.com  या ई-मेल आयडी वा अथवा शक्य असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन विभागीय उपआयुक्त कार्यालय, अमरावती यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा