विभागीय
लोकशाही दिनाचे
सोमवारी
आयोजन
अमरावती दि. 5 : येथील विभागीय आयुक्त
कार्यालयात सोमवार दि. 8 मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य
शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जारी केलेल्या
सुचनांचे पालन करुन लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे सदर विभागीय लोकशाही
दिनामध्ये स्वीकृत अर्ज असणाऱ्या अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामान्य प्रशासन
विभागाचे उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा