“गिफ्ट तिलापिया हॅचरी मत्स्यबीज” शेतक-यांसाठी ठरणार वरदान
- प्रादेशिक उपायुक्त श्री. विजय शिखरे
आतापर्यंत गिफ्ट तिलापियाच्या
मत्स्यबीजासाठी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथिल एमपेडाच्या हॅचरीवरच अवलंबून रहावे
लागत होते. इसापूर केंद्रामध्ये गिफ्ट तिलापिया मत्स्यबीज उत्पादन सुरू झाल्याने हे विदर्भ-मराठवाड्यातील किंबुहना
महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी मोठे वरदान ठरेल” असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय विभागाचे
प्रादेशिक उपआयुक्त श्री. विजय शिखरे
यांनी केले. 28 फेब्रुवारी
- राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, इसापूर येथे गिफ्ट तिलापिया मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या
उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या
उद्घाटन प्रसंगी मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री.
विजय हापसे, श्री. अजय मेसरे, श्री. भूषण सानप व श्री. नयन पिंगलवार आणि वेस्टकोस्ट
फ्रोझन फूड्सचे तंत्रज्ञ
श्री. दिपेश कदम, श्री. अमोल राठोड, श्री. कृष्णा तिवारी, श्री. प्रवेश दुबे व इतर
कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री.शिखरे म्हणाले, गिफ्ट तिलापिया मत्स्यसंवर्धनातून शेतक-यांना
शाश्वत अतिरिक्त उत्पादनाचे साधन निर्माण होणार आहे. गिफ्ट स्ट्रेन असलेली तिलापियाची ही महाराष्ट्रातील पहिलीच हॅचरी असून इसापूर केंद्र
“बहु प्रजाती मत्स्यबीज
उत्पादन केंद्र” म्हणून नावारूपास यावे असा मत्स्यव्यवसाय विभागाचा मानस असल्याचे श्री. शिखरे
यांनी सांगितले.
यावेळी मत्स्यबीज केंद्राचे प्रमुख व संचालक, वेस्टकोस्ट फ्रोझन फूड्स श्री.नितिन निकम यांनी माहिती देतांना सांगितले की,
राष्ट्रीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, इसापूर हे वेस्टकोस्ट फ्रोझन फूड्स यांच्यामार्फत संचलित करण्यात येत आहे. इसापूर केंद्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करून गिफ्ट तिलापिया हॅचरी उभारण्यात आली आहे.
साधारणत: ऑगस्ट महिन्यापासून सर्वांना मत्स्यबीज उपलब्ध होईल. कटला, रोहू, सिप्रिनस
या प्रजातींचे मत्स्यबीज येथे उपलब्ध होतच आहे. त्याचबरोबर पंगॅसिअस, जयंती रोहू, प्रगत
कटला, अमूर कार्प, तिलापियाच्या इतर स्ट्रेन्स, इत्यादी जलद वाढणा-या प्रजातींचे पुढील
कालावधीमध्ये उत्पादन या केंद्रामध्ये घेण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.
गिफ्ट तिलापिया मासा इतर प्रजातींच्या तुलनेने कमी कालावधीमध्ये
जलद वाढणारा असल्याने शेतक-यांना चांगला नफ़ा मिळवून देणारा आहे. जिवंत वाहतुकीसाठीदेखिल
तिलापिया हि अत्यंत चांगली प्रजाती आहे. याचे
मत्स्यसंवर्धन करण्यापुर्वी मत्स्यव्यवसाय विभागाची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याची
माहिती श्री.शिखरे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा