दुष्काळग्रस्त/टंचाइग्रस्त भागातील
इयत्ता 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
अमरावती दि. 10 : शैक्षणिक वर्ष 2017-2018
व 2018-2019 मधील खरीप हंगामातील/दुष्काळग्रस्त भागातील इ.10 वी व 12 वीचे विद्यार्थी
परीक्षा शुल्क माफीस पात्र असून अद्याप ज्या
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी
स्वत:च्या/पालकांच्या-आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा/उच्च
माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित
क्षेत्रातील इ.10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या
कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात
आलेले आहे. संबंधितांनी माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा.
याबाबतची माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in
या अधिकृत संकेतस्थळावर इ. 10 वी साठी http://freefund.mh-ssc.ac.in
इ. 12 वी साठी http://freefund.mh-hsc.ac.in ह्या लिंकवर
प्रसिध्द करण्यात आली आहे, असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा