विभागीय आयुक्तालयात ‘वीर बाल
दिवस’ साजरा
अमरावती, दि. 26 : ‘वीर बाल दिवस’
निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज साहिबजादा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेह
सिंगजी यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले.
उपायुक्त गजेंद्र बावने, सहाय्यक
आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षल चौधरी, नायब
तहसीलदार मधुकर धुळे यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान
मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून 26 डिसेंबर हा दिवस "वीर बाल
दिवस" म्हणून साजरा केला जातो. साहिबजादा जोरावर सिंगजी आणि साहिबजादा
फतेह सिंगजी हे दोघेही 9 वर्षे आणि 7 वर्षांचे असतांना दोघांना सन 1705 मध्ये मुघलांनी
भिंतीत जिवंत गाढले होते. या दोन लहान मुलांना मोगलांनी दोन मोठ्या भावांसह मारले.
गुरू गोविंद सिंग जी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शौर्य आणि आदर्श म्हणून दरवर्षी
या दिवशी अन्यायाविरुद्ध त्यांच्या प्रतिकारशक्तीचे स्मरण केले जाते.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी 2022 पासून दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला
जाईल, अशी घोषणा केली होती. 17 व्या शतकात शहीद झालेल्या 4 साहिबजादांच्या (गुरु
गोविंद सिंग जींचे चार पुत्र) शौर्याला श्रद्धांजली म्हणून हा दिवस साजरा केला
जाईल असे पंतप्रधान मोदी यांनी 09 जानेवारी 2022 रोजी श्री गुरु गोविंद सिंग जी
यांच्या प्रकाश पर्व किंवा शिखांचे 10 वे गुरू आणि खालशाचे संस्थापक यांच्या
जयंतीनिमित्त ही घोषणा केली होती, अशी माहिती श्री. मस्के यांनी यावेळी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा