इंडियन
ऑईल कार्पोरेशनच्या
‘छोटु’
गॅस सिलेंडरचा वर्धापनदिन साजरा
अमरावती, दि. 11 : इंडियन ऑईल कार्पोरेशनने गॅसच्या क्षेत्रात
ग्राहकांच्या सोईसाठी बाजारात आणलेल्या ‘छोटु’ या 5 किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरला दोन
वर्षे झाल्याच्या निमित्ताने अमरावती बस स्थानक परिसरात वर्धापन दिन साजरा करण्यात
आला.
गॅस सिलेंडरच्या क्षेत्रात इंडियन ऑईल कार्पोरेशनने दोन वर्षापूर्वी ग्राहकांसाठी हा ‘छोटु’ गॅस सिलेंडर बाजारात आणला आहे. वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम घेऊन अमरावती येथे ग्राहकांना या विषयी माहिती देवून जनजागृती करण्यात आली.
इन्डेनचे विभागीय विक्री अधिकारी श्री आकाश आमले यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरीच कागदपत्रे द्यावी लागतात परंतु आता एलपीजी सिलिंडर मिळणे सोपे झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला फक्त एका कॉलवर घरी 5 किलो एलपीजी सिलिंडर सहज मिळू शकेल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. 5 किलोचे हे सिलिंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या 2 तासात तुमच्या घरी येईल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऍड्रेस प्रूफ देण्याची आवश्यता लागणार नाही. 5 किलोचे हे गॅस सिलिंडर ग्राहक पुन्हा भरून घेऊ शकतात यासाठी इंडियन गॅसच्या कोणत्याही विक्री केंद्रावर संपर्क करू शकता.यावेळी बसस्थानक परिसरातील चालक-वाहक व प्रवाशी उपस्थित होते. नागपूरला
जाणाऱ्या विद्यार्थीनीच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी
आदिशक्ती गॅसचे व्यवस्थापक मधूकर रायेवार, शुभम भिंगारे यादव गॅस एजन्सीचे अखिलेश यादव
व नितेश गॅसचे मालक सौ. परतानी, देशमुख गॅस एजन्सीचे व्यवस्थापक बबलू भैय्या बासुंदे
व इतर वितरक उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा