जप्त रेतीसाठ्याचा चांदूर रेल्वे येथे शुक्रवारी लिलाव
अमरावती, दि. 25: अवैधरीत्या साठा केल्याचे आढळल्यावरून पथकाने जप्त केलेल्या 120 ब्रास वाळूचा जाहीर लिलाव चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (27 जानेवारी) दुपारी 4 वाजता होणार आहे. इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धामणगाव तालुक्यातील नायगाव रेतीघाटाचा 2021-2022 या आर्थिक वर्षात लिलाव झाला होता. या घाटातून अवैध वाळू उत्खनन करुन त्याची विनापरवाना साठवणूक झाल्याचे निदर्शनास येताच विशेष पथकाकडून ते साठे जप्त करण्यात आले. या 120 ब्रास वाळूची हातची किंमत 72 हजार रू. ठेवण्यात आली आहे. त्यानुसार लिलाव होईल.
लिलावात सहभागी होणारे व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना लिलावात सहभागी होण्याकरीता अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅन कार्ड, जीएसटी नंबर, करारपत्र, रहिवास पुरावा व आयकर भरणा करत असल्याबाबतचा पुरावा आदी दस्तऐवज द्यावे लागतील. अपसेट प्राईसच्या 25 टक्के इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाद्वारा भराव्या लागतील.
सर्वोच्च बोली धारकाने सर्वोच्च बोलीची 100 टक्के रक्कम लिलावाच्या दिवसानंतर कार्यालयीन कामकाजाच्या 12 तासाच्या आत भरणा करणे आवश्यक आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा