बुधवार, २५ जानेवारी, २०२३

22 जानेवारीला समुदाय आरोग्य अधिकारी पदाची प्रवेश परीक्षा

 22 जानेवारीला समुदाय आरोग्य अधिकारी पदाची प्रवेश परीक्षा

 प्रवेशपत्र https://arogya.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावतीदि. 19 (विमाका)  : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत अकोला परिमंडळातील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer) या पदाकरीता राज्यस्तरावरून दि. 12 डिसेंबर 2022 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. तसेच अर्ज स्विकृती दि.20 डिसेंबर 2022 पर्यंत होती. अकोला परिमंडळांतर्गत सदर पदाकरीता बऱ्याच प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असुन अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या दि. 22 जानेवारी 2023 रोजी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी पदाचे प्रवेश परिक्षापत्र https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी परिक्षेकरीता अर्ज केलेल्या अकोला, अमरावती व यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णावाल वाणिज्य विद्यालय, रतनलाल प्लॉट, अकोला हे राहील. बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी पार्क अकोला हे असेल तर वाशिम जिल्ह्याच्या न्यु ईग्लिश हायस्कुल, ज्युनियर कॉलेज, रामदास पेठ, पोलीस स्टेशन जवळ, अकोला हे राहणार.

पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावरुन आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन संबंधित परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेत परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला मंडळाचे उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. तरंगतुषार वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा