अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
निवडणुकीची कामे समन्वयपूर्वक पार पाडावीत
- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे
अमरावती, दि. 4 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ
निवडणूकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने नोडल
अधिकारी व जिल्हा यंत्रणांनी समन्वयपूर्वक कामे करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त
तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.
निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा
घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयातील सभागृहात
झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय
भाकरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, नामांकन
प्रक्रिया, मतदान साहित्य व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, मतदान व मतमोजणी
केंद्रावरील व्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदार यादी आदी सर्व प्रक्रिया
समन्वयाने दक्षतापूर्वक पार पाडावी. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे. माध्यम
प्रमाणीकरण समितीबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम येथे चोख
बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याअनुषंगाने बैठकीनंतर विलासनगर
येथील गोदामाची पाहणी निवडणूक निर्णय अधिका-यांनी केली. त्याचप्रमाणे, पशुसंवर्धन
कार्यालयाच्या परिसरात निर्माण होत असलेल्या ईव्हीएम गोडाऊनची पाहणीही करण्यात
आली.
विभागीय स्तरावरील नोडल अधिका-यांच्या
नेमणुकीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी निर्गमित केला असून,
उपायुक्त श्री. पवार, तहसीलदार वैशाली पाथरे व नायब तहसीलदार राजेश चौधरी यांच्याकडे
नामांकन प्रक्रिया, मतपत्रिका छपाई, टपाली मतपत्रिका आदी जबाबदारी देण्यात आली
आहे.
आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था,
पोलीस विभागाशी समन्वय, तक्रार नियंत्रण व निवारण कक्षाची जबाबदारी उपायुक्त श्री.
लहाने, संबंधित जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार निकिता जावरकर यांच्याकडे,
तसेच वाहतूक आराखडा, व्यवस्थेची जबाबदारी श्रीमती जावरकर, नायब तहसीलदार प्रशांत
अडसुळे, कमलेश वानखडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
मतदान व मतमोजणीबाबत प्रशिक्षणाची
जबाबदारी सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विजय सूर्यवंशी यांच्याकडे, तर चिन्हांकित मतदार यादी व टपाली मतपत्रिका, तसेच मतदान
साहित्य व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक
अधिका-यांकडे आहे. मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था. मतमोजणी प्रक्रिया आदींबाबत
उपायुक्त श्री. बावणे, श्री. म्हस्के, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार रवी
महाले, विजय सूर्यवंशी, संतोष नटवे, सचिन पवार, पवन चेचरे, प्रतिक पावडे
यांच्याकडे जबाबदारी आहे. विविध परवानगी कक्षाबाबत उपायुक्त श्री. भाकरे
यांच्याकडे, तर मतदान केंद्रावरील व्यवस्थेबाबत संबंधित सर्व निवासी
उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिका-यांकडे जबाबदारी आहे.
मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक आयोगास
अहवाल सादर करणे आदी जबाबदारी सहायक आयुक्त श्री. काळकर, नायब तहसीलदार संजय
मुरतकर, सुजन सोळंके यांच्याकडे आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा