राज्य मागासवर्ग आयोग घेणार विद्यापीठातील
पदभरतीचा आढावा
अमरावती, दि. 10 : राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपस्थितीत संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी) विद्यापीठातील
पदभरतीबाबत आढावा बैठक होणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नि. न्यायमूर्ती आनंद
वसंत निरगुडे आहेत. आयोगाचे सदस्य ॲड चंद्रलाल मेश्राम, डॉ. श्रीमती निलीमा सरप (लखाडे), डॉ. गोविंद काळे हे दि. 14 ते 17 फेब्रुवारी या
कालावधीत नागपूर, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील विविध विद्यापीठात बैठकांद्वारे
रिक्त पदांचा आढावा घेणार आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘अकृषी विद्यापीठ व
अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील दि. 1.10.2017 अखेरची विद्यार्थी संख्या गृहित
धरून मंजूर शिक्षण पदभरतीचा आढावा’ या विषयावरील बैठक बुधवारी सकाळी 10.30 पासून
सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. विद्यापीठाचे कुलगुरु, आरक्षण कक्षाचे उपकुलसचिव, विभागीय
मागासवर्ग कक्षाचे सहायक आयुक्त उच्च शिक्षण सहसंचालक यांच्यासमवेत संबंधित
अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.
आयोगाच्या सदस्यांचे मंगळवारी (दि. 14) सायंकाळी 6 वाजता
अमरावतीत शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम होईल. बुधवारी बैठकीनंतर सायंकाळी
5 वाजता त्यांचे नागपूरकडे प्रयाण होईल.
0000000