सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन कार्यक्रम · धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अभिनव उपक्रम · आवेदन अर्ज सादर करण्याची 15 फेब्रुवारी अंतीम मूदत
अमरावती, दि. 02 : आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी या प्रकल्पाव्दारे शासकीय, अनुदानित व एकलव्य मॉडेल स्कुल या शाळांमध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी नीट व सीईटी परीक्षांचे मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज संबंधित शाळामार्फत 15 फेब्रुवारीपर्यंत धारणी प्रकल्प कार्यालयास सादर करावी, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
या योजने अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले तसेच मार्च 2026 मध्ये दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांकडून NEET (नीट) व CET (सिईटी)/JEE (जेईई) या परीक्षांची तयारी करुन घेण्यात येईल. योजने अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तसेच विद्यार्थ्यांला अनुसूचित जमाती प्रर्वगाचा जातीचा दाखला प्रवेशावेळी सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे. विद्यार्थी मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ असावा. चाळणी परीक्षा मे 2026 मध्ये घेण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर प्रशिक्षणासाठी विहित नमून्यातील आवेदन पत्र दि. 15 फेब्रुवारीपर्यंत धारणी प्रकल्प कार्यालयास सादर करावीत. नमूद मुदतीनंतर प्राप्त होणारे आवेदन पत्र स्विकारल्या जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी व आवेदन अर्जाचा नमूना प्राप्त करण्यासाठी धारणी, प्रकल्प कार्यालयाशी प्रत्यक्षरित्या अथवा दूरध्वनी क्रमांक 07226-224217 आणि poitdp.dharni-mh@gov.in ईमेल यावर संपर्क साधावा, असेही प्रकल्प कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा