लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
अमरावती विभागात तीन नामनिर्देशनपत्र दाखल
अमरावती, दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये एक व बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन असे एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश्वरा महा स्वामीजी उर्फ दीपक यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून संजय रामभाऊ गायकवाड यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने एक व अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केलीत.
विभागातील अकोला आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.
विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा