दुष्काळसदृश भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी
अमरावती, दि. 27 : राज्यातील सन 2023-24 मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने इयत्ता दहावी व बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचे प्रस्ताव संबंधित शाळा, महाविद्यालयामार्फत शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला तसेच अधिकृत संकेतस्थळावर सादर करावे, असे आवाहन राज्यमंडळ, पुणे च्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजने अंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पात्रतेच्या आवश्यक माहिती तसेच स्वत:च्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याची माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा.
या संदर्भात तपशीलवार माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ http://mahahsscboard.in माध्यमिक शाळांसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक शाळांसाठी http://feerefund.mh-hsc.ac.in यावर उपलब्ध करुन देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळांना भेट द्यावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाव्दारे करण्यात आले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा