उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी संविधान मंदिराचे लोकार्पण
अमरावती, दि.
12 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
येथे रविवार, दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित कार्यक्रमात संविधान
मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण होणार
आहे.
जागतिक लोकशाही
दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन होत असून राज्यातील 434 आयटीआयमध्ये 15
सप्टेंबरला, सकाळी 10.30 वाजता संविधान दिन लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार,
उदयोजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख
उपस्थिती लाभणार आहे.
कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव गणेश पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे
संचालक सतिश सुर्यवंशी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त प्रदीप
डांगे यांच्यासह विभागाचे अन्य वरीष्ठ अधिकारी या महत्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित
राहणार आहे.
या कार्यक्रमाला
नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता
विभागाव्दारे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राज्यातील सर्व नागरिकांना समाजमाध्यमांवर
लाईव्ह पाहता येईल, असेही विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा