शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

‘जागतिक महिला दिनानिमित्त’ 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत

‘जागतिक महिला दिनानिमित्त’ 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत मुंबई दि. 28: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्त' महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 6, शुक्रवार दि. 7, शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. महासंचालनालय समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. एक्स - https://twitter.com/MahaDGIPR फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR समाजाच्या विकासात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महिलांना समान हक्क मिळणे तसेच त्यांच्या अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिवस' जगभरात साजरा केला जातो. याअनुषंगानेच महिला सबलीकरण, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' या आणि अशा अनेक योजना, धोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येत आहेत. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजना आणि निर्णयांबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा