मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंत्रिमंडळ बैठक मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२५ मंत्रिमंडळ निर्णय - ३ (संक्षिप्त )
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मंत्रिमंडळ बैठक
मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२५
मंत्रिमंडळ निर्णय - ३ (संक्षिप्त )
पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या (ता. मुळशी) गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या तरतूदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता. (मृद व जलसंधारण विभाग)
शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ.
( महसूल विभाग)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा