बुधवार, २ जुलै, २०२५

‘दिलखुलास’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचित धूरत यांची मुलाखत

मुंबई, दि. २ : बदलत्या जीवनशैलीमुळे व वातावरणातील बदलांमुळे त्वचेचे विकार, केस गळती यांसारख्या समस्या वाढीस लागल्या आहेत. यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयातील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचित धूरत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘त्वचा विकास व उपचार पद्धती’ या विषयावर आधारित ही मुलाखत शुक्रवार दि. ४, शनिवार दि. ५, सोमवार दि. ७, मंगळवार दि. ८ आणि बुधवार दि.९ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित केली जाईल. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वातावरणातील बदल, मानसिक ताणतणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा विकार, केस गळती यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये त्वचेशी निगडीत आजारांमध्ये अनेक संसर्गजन्य तसेच कर्क रोगांसारखे गंभीर आजारांचा देखील समावेश आहे. ही बाब विचारात घेवून आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. याअनुषंगाने ‘दिलखुलास’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. धूरत यांनी त्वचाविकारांचे प्रकार, कारणे, प्रतिबंध आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत याबाबत सखोल माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा