शुक्रवार, ११ जुलै, २०२५

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचिता धूरत यांची मुलाखत

मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'त्वचाविकार व अधुनिक उपचार पद्धती' या विषयावर लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयातील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचिता धूरत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिवरून रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वातावरणातील बदल, मानसिक ताणतणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा विकार, केस गळती यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये त्वचेशी निगडीत आजारांमध्ये अनेक संसर्गजन्य तसेच कर्क रोगांसारखे गंभीर आजारांचा देखील समावेश आहे. ही बाब विचारात घेवून आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. याअनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. धूरत यांनी त्वचाविकारांचे प्रकार, कारणे, प्रतिबंध आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत याबाबत सखोल माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा