वाढीव गुणासाठी
प्रस्ताव सादर करण्यास
25 जून पर्यंत
मुदतवाढ
अमरावती,
दि. 17 : शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील शालेय खेळाडू, एन.सी.सी. आणि स्काऊड
गाईडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय मंडळ कार्यालयाकडे
सादर करण्यास दिनांक 25 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
मार्च 2020 मधील इयत्ता 10 वी 12 वी मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव
जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करण्यास 20 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही मुदत वाढ केवळ 2019-20 या एका शैक्षणिक वर्षाकरीता लागू राहील. केाणताही पात्र विद्यार्थी
या गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी
दक्षता घ्यावी ,असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.
अशोक भोसले यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा