परदेशातील
शिक्षणासाठी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे
*अपर
आदिवासी आयुक्तांचे आवाहन
अमरावती, दि. 19 :
परदेशातील
पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत
अर्ज सादर करावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी केले आहे.
आदिवासी विकास विभागातर्फे
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील पदवी आणि पदव्यूत्तर
अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज दि. 25 जून 2020 पर्यंत प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद,
कळमनुरी किंवा औरंगाबाद येथे सादर करावे लागणार आहे.. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ
घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 6 लाख
रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी यांच्या
कार्यालयात उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी दि. 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे, असे
अपर आयुक्त विनोद पाटील यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा