मुलांनी शारीरिक साक्षरतेसाठी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे
- सुनिल केदार
मुंबई ,दि.१७: मुलांनी शारीरिक
साक्षरतेसाठी, क्रीडा कौशल्ये शिकणे
गरजेचे आहे. मैदानी खेळामुळे
आत्मविश्वास निर्माण होतो .याआत्मविश्वासाने मुले सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतात
असे प्रतिसाद राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास ,क्रीडा आणि युवक कल्याण
मंत्री सुनिल केदार यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित
श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालय अमरावती,ई एल एम एस स्पोर्टस रिलायन्स फाउंडेशन,
जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार चे आयोजन 17 -20
जून या दरम्यान होणार आहे आज उद्घाटन माननीय श्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले
त्यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रत्येक मुलाचे जीवन
क्रियाशील होण्याकरिता तयार केलेला दृष्टिकोन या विषयावर आयोजित चार दिवसाच्या
व्याख्यानमालेत श्री.केदार बोलत होते.
श्री केदार म्हणाले,
सर्व मुलांमध्ये शारीरिक साक्षरता विकसित करण्यासाठी पालक, शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांच्या
एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असते. तसेच मुलांच्या विकासात गुंतलेल्यांना शारीरिक
साक्षरतेचा अर्थ काय आहे आणि ते कसे विकसित केले जाऊ शकते हे समजून घेणे देखील
गरजेचे आहे.
प्रौढांप्रमाणे कौशल्य
बजावण्याऐवजी ते शिकत असलेल्या कौशल्याच्या पुढील आवृत्तीकडे जाण्याचे पालकांचे
लक्ष्य असले पाहिजे. मुलांसमवेत काम करणा-यांना कौशल्ये शिकण्याच्या अवस्थांशी
परिचित असणे देखील आवश्यक असल्याचे श्री केदार यांनी सांगितले. या वेबिनार मध्ये
प्रास्ताविक भाषणांमधून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अंजली ठाकरे यांनी सर्व
पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि या वेबिनार बद्दल संपूर्ण माहिती तसेच शारीरिक
साक्षरता मागचा हेतू उद्देश समजावून सांगितले.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा