परदेशात
पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी
5
जुलैपर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती, दि. 29 : परदेशात पदवी व पदव्यूत्तर
शिक्षण घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांनी 5 जुलै पर्यंत आपले अर्ज सादर करावे असे
आवाहन धारणीचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. आदिवासी विकास विभागातर्फे
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर
अभ्यासक्रम पूर्ण करता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज दि. 5 जुलै 2020 पर्यंत प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आादिवासी विकास प्रकल्प धारणी येथे सादर करावे. विद्यार्थ्यांना
एम.बी.ए, वैद्यकिय अभ्यासक्रम, बी.टेक, विज्ञान, कृषी व इतर विषयांसाठी
शिष्यवृत्ती देण्यात येणार असून दहा विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे
अर्ज प्राप्त झाल्यास इयत्या 12 वी व पदवी अभ्याक्रमात प्राप्त गुणांच्या आधारे पात्र
विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत अधिवास
प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या योजनेचा
लाभ मिळण्यासाठी त्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत
वाढविण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी, धारणी कार्यालयात उपलब्ध
असून विद्यार्थ्यांनी 5 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे असे प्रकल्प अधिकारी डॉ.
मिताली सेठी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा