वसतीगृह
इमारत भाड्याने मिळणेसाठी
प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन
अमरावती,
दि.
24 : आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प
कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी ता. धारणी जि. अमरावती अंतर्गत
येत असलेल्या आदिवासी मुला/मुलींचे वसतीगृह अमरावती करीता सर्व सोयी सुविधायुक्त
विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता 1000/500 व 300 क्षमता असलेली इमारत भाडेतत्वावर
घ्यावयाची आहे. त्यासाठी इच्छुक इमारत मालकांनी दि. 30 जून, 2020 पर्यंत प्रकल्प
कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांचे कार्यालयात कार्यालयीन
वेळेत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा