जिल्ह्यात कलम 37
(1) व (3) लागू
अमरावती, दि.04 :
जिल्ह्यात शांतता व
सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांना प्रदान करण्यात
आलेल्या अधिकारानुसार मुंबई पोलिस कायदा
1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यामध्ये प्रभावी उपाययोजना करण्याकरिता रात्री 9
ते सकाळी 7 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून
जिल्ह्यात दि. 1 जून ते 16 जून
2020 पर्यत कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या
कलमांचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे
अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा