औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या
रोजगार मेळाव्यात 31 युवकांची निवड
अमरावती, दि. 30 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
कार्यालय, शास. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तथा मुलभुत प्रशिक्षण व अनुषंगिक सुचना
केंद्राच्या वतीने दि.25 जून रोजी सुझुकी मोटर्स गुजरात प्रा. लि. यांच्या तर्फे रोजगार
भरती मेळावा आयोजित करण्यांत आला होता. या भरती मेळाव्यात 31 विद्यार्थ्यांची निवड
करण्यात आली असून त्यांना रोजगार प्राप्ती झाली आहे. या भरती मेळाव्यात जिल्ह्यातून
आयटीआय उत्तीर्ण 56 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 46 विद्यार्थी मुलाखतीत पात्र
ठरले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, प्रादेशिक
कार्यालय अमरावतीचे सहाय्यक संचालक एन. पी. येते, तसेच संस्थेच्या प्राचार्या श्रीमती
एम. डी. देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य, सहाय्यक
प्रशि. सल्लागार श्रीमती एम. आर. गुढे, प्रशि. अधिकारी सदानंद गावंडे, श्रीमती पाटील
संस्थेचे निदेशक आदी उपस्थित होते. निवड झालेल्या उमेदवारांना रोजगारस्थळी घेऊन जाण्यासाठी
सुझुकी कंपनी तर्फे मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्य
एम. डी. देशमुख यांनी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा