सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती, व्यवस्थापनाबाबत
ऑनलाईन प्रशिक्षण
अमरावती, दि. 25 : घातखेड कृषि विज्ञान केंद्र, महिला व बालविकास प्रकल्प, अमरावती
आणि चांदूरबाजार यांच्यातर्फे सेंद्रीय पद्धतीने पोषण परसबाग निर्मिती आणि व्यवस्थापाबाबत
ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या वेबीनारमध्ये अमरावती आणि चांदूरबाजार तालुक्यातील
60 अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विशेषतज्ज्ञ
डॉ. प्रणिता कडू यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. कडू यांनी प्रत्येकाची प्रतिकारशक्ती
वाढावी, दैनंदिन आहारात विविध सुष्म पोषणद्रव्ये पुरविण्याकरिता घरीच उत्तम प्रतीचा
विषमुक्त हिरव्या ताज्या पाले-फळभाज्या पिकवणे गरजेचे झाले आहे. उत्तम आरोग्यासाठी
आवश्यक पालेभाज्यातील जीवनसत्वाचे महत्व आणि अभावाने होणारे आजार विशद करून पोषणसमृद्धीचे
महत्त्व सांगितले.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि संरक्षण देण्यासाठी
जीवनसत्वांची आवश्यकता असते. मात्र बहुतांश जीवनसत्व शरीरात तयार होत नसल्याने दैनंदिन
आहारातून ती घेणे गरजेचे ठरत असल्याने जीवनसत्वाचे स्रोत सांगितले. त्यासाठी परसबागेमध्ये
घ्यावयाच्या पालेभाज्या, लागवडीसाठी उपयुक्त जमीन, हवामान, पाण्याची गरज, हंगामानुसार
पालेभाज्यांची लागवड, त्यासाठी आवश्यक वाफे, सेंद्रीय खते, किडीवर सेंद्रिय किटकनाशकांबाबत
मार्गदर्शन करण्यात आले.
लोह, कॅल्शियम, जीवनसत्व-अ-क, आवश्यक प्रथिने, जीवनसत्व
ब यांच्या अभावामुळे शरीरावर होणारे परिणाम, जीवनसत्वाचे फायदे मिळण्यासाठी पोषणबागेतून
नियोजनबद्ध हंगामानुसार महत्वपूर्ण भाज्यांची लागवड केल्यास कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित
राहू शकते. त्याकारिता स्रोत असणाऱ्या भाज्या, फळे व दीर्घायू उपयुक्त शेवगा, कडीपत्ता,
आवळा, पपई, लिंबू आदी झाडे लागवडीचा आग्रह केला. तसेच औषधीयुक्त झाडे, विड्याची पाने,
पुदिना, कृष्ण तुळस, हळद, अद्रक, गवती चहा, कोरफडीचे कोरोनाकाळातील आरोग्यविषयक महत्त्व
सांगून परसबागेत लागवड करण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षणासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. दुर्गे
यांनी परिश्रम घेतले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा