कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी
खबरदारी, आहारविषयक उपाययोजना
Ø अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना मार्गदर्शन
अमरावती,
दि. 25 : घातखेड कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्पातर्फे अमरावती आणि
चांदुरबाजार येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना आहारविषयक उपाययोजनाबाबत ऑनलाईन
प्रशिक्षण देण्यात आले
कृषि
विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विभागाच्या विशेषज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी सद्याच्या
कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘कोरोनाकाळात
स्वास्थ सुरक्षिततेसाठी खबरदारी आणि आहारविषयक उपाययोजना’ याबाबत मार्गदर्शन केले.
कोरोनाची
प्राथमिक लक्षणे, खबरदारी, उपाययोजनासोबतच आहारातील पोषणासंबंधी गरजा सांगून माहिती
दिली. प्रशिक्षणात श्रीमती कडू यांनी घरीच सुरक्षित आणि स्वस्त सॅनिटायझर तयार करण्याची
विधी सांगितली. कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असणारी फळे, भाज्या व
पौष्टिक आहारबाबत माहिती देऊन बाहेरील वस्तू निर्जंतूक करण्यासाठी घरगुती साहित्याचे
महत्व सांगितले,
लसीबाबत
असलेले गैरसमज तसेच लसीकरणाचे महत्व व आवश्यकता याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला
कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अतुल कळसकर यांच्यासह 50 अंगणवाडी पर्यवेक्षिका
उपस्थित होत्या. प्रशिक्षणासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. दुर्गे यांनी पुढाकार
घेतला. याचविषयीचे प्रशिक्षण धारणी आणि भातकुली तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी
घेण्यात आले. बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण आणि श्रीमती भस्मे यांनी यासाठी
परिश्रम घेतले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा