पाचवी व आठवीच्या द्वितीय बॅचच्या
मूल्यमापनाचा निकाल 28 रोजी
अमरावती,
दि. 25 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक
व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता 8 वी
(उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ द्वितीय बॅचच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दि.
1 ते 10 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
त्या
मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल (www.msbos.mh-ssc.ac.in) या संकेतस्थळावर दि. 28 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांला
त्याच्या माहितीची प्रत (Prinout) घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता
5 वी/इयत्ता 8 वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र
यथावकाश वितरित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ.
अशोक भोसले यांनी कळविले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा