आयटीआय उर्त्तीर्ण युवकांसाठी
25 रोजी रोजगार भरती मेळावा
अमरावती,
दि.21: जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्यावतीने औेद्योगिक
प्रशिक्षण संस्थेतील एन एस सभागृहात दि. 25 जून रोजी सकाळी 9 वाजता आय टी आय उत्तीर्ण
युवकासांठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. रोजगार मेळाव्यात सुजूकी
मोटर्स गुजरात प्रा.लि.ही कंपनी उमेदवाराची फीटर, डिजेल मॅकॅनिक, वेल्डर, पेन्टर इत्यादी
पदासांठी निवड करणार आहे. अठरा ते तेवीस वर्षे वय असलेले, दहावी व आयटीआय उत्तीर्ण
युवक या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील. उमेदवारांनी वर्ष 2016 ते 2020 या कालावधीतील
आय. टी. आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे, आधार कार्ड/पॅन कार्डची
मुळ प्रत, गुणपत्रिकेसह उपस्थित राहावे, असे संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम.
डी. देशमुख यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा